Breaking

शुक्रवार, १८ जून, २०२१

भुरकवडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर*मा.सभापती संदीपदादा मांडवे यांनी केली उपकेंद्राची पाहणी.



*भुरकवडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर*
मा.सभापती संदीपदादा मांडवे यांनी केली उपकेंद्राची पाहणी.

वडूज प्रतिनिधी / शरद कदम

         भुरकवडी ता.खटाव येथे नव्याने सुरू असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे माजी आरोग्यमंत्री फौजिया खान यांनी मंजूर केले. परंतु या कामात जिल्हा पातळीवर काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. या अडचणी सोडविण्यासाठी भुरकवडी गावचे सुपुत्र आणि मंत्रालय सचिव प्रविण लावंड यांनी विशेष प्रयत्न केले. श्री. लावंडसाहेब व ग्रामस्थांच्या विनंतीवरून तत्कालीन पालकमंत्री विजयबापू शिवतारे, खटावचे माजी आ.डॉ.दिलीपराव येळगांवकर, विधान परिषदेचे मा.आ.प्रभाकर घार्गे व खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीपदादा मांडवे यांनी जिल्हा नियोजन समिती व अन्य माध्यमातून सहकार्य करून या उपकेंद्राचे भूमिपूजन केले.
           या उपकेंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर चालू असून मा. सभापती संदीप मांडवे यांनी या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. पाहणी करतेवेळी मांडवे यांनी ठेकेदारांना काही सूचना केल्या. सध्याच्या कोरोनाच्या संकटात या उपकेंद्राचा भुरकवडी परिसरातील जनतेसाठी खुप मोठया प्रमाणात फायदा होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नसल्याकारणाने आपण या उपकेंद्राचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेच्या सेवेत रुजू करावे. व अन्य काही सुचना देखील केल्या आहेत.
           या उपकेंद्राच्या नवीन इमारतीचा निधी ४२ लाख रूपये मंजूर आहे. तर उपकेंद्राकरिता १ वैद्यकीय अधिकारी, २ नर्स व कर्मचारी यांचीही सोय होणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी गुरसाळेचे सरपंच अॅड. रोहन जाधव, लोणीचे मा.सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, भुरकवडीच्या सरपंच सौ.ललिता कदम, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, मा.सरपंच एस.के.कदम सर, पत्रकार शरदराव कदम, सोसायटीचे मा.चेअरमन मधूकर कदम, छगनराव कदम, उत्तम कदम, राजेंद्र कदम आदिची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा