*शिवराज्याभिषेक दिन भाजपा तालुका संपर्क कार्यालयात साजरा*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
शिवराज्याभिषेक दियानिमित्त भाजपा तालुका संपर्क कार्यालयात तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले .
यावेळी चिवटे म्हणाले की मुघल पातशाहीच्या अंधारात बुडालेल्या जनतेला स्वराज्याचा उजेड दाखवणाऱ्या आणि सर्वस्वी रयतेचा विचार करणाऱ्या राजांचा आजच्या दिवशी रायगडावरती 32 मण सोन्याच्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला ,
त्यांचा सोहळा करण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकण ,संजय अण्णा घोरपडे, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके ,प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील ,पांडे ग्रामपंचायत सदस्य नितीन निकम, नेचर डिलाईट चे संकलन अधिकारी प्रसाद गेंड, युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज मुसळे, दीपक भोसले ,गणेश साखरे ,महादेव गोसावी, अक्षय शहा आदीजण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा