Breaking

बुधवार, १६ जून, २०२१

भुरकवडीकरांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा - जिल्हाधिकारी*कोरोनामुक्तीतील उपाययोजनांची ग्रामस्थांकडून घेतली माहि ती



*भुरकवडीकरांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा - जिल्हाधिकारी*

कोरोनामुक्तीतील उपाययोजनांची ग्रामस्थांकडून घेतली माहिती 
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

         खटाव तालुक्यातील भुरकवडी सारख्या छोट्या गावात सलग ३० वर्ष ग्रामपंचायत बिनविरोध करून या वेळेस ग्रामपंचायत सदस्यपदी सातच सात महिला ग्रामपंचायत सदस्य देऊन या ठिकाणी ग्रामसेविका, आरोग्य सेविका, शाळेतील दोन शिक्षिक यात देखील महिला शिक्षिका असून ग्रामस्थांनी गावचा कारभार विश्वासाने महिलांच्यावर टाकला आहे. या सर्व महिलांचा कारभार आदर्शवत चालला असून इतर गावांनीही भुरकवडी गावचा आदर्श घ्यावा असे मत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी खटाव तालुका दौऱ्यावेळी केले.
         ३० मिनिटांच्या चर्चेत जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण गावातील कोरोना संदर्भातील व विविध उपक्रमांची माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे नव्याने सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलोशन सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीची आढावा घेताना कोरोना प्रादूर्भावाला अटकाव करण्यासाठी राबविलेल्या उपाययोजना व गावातील लसीकरणाबाबतची माहिती सरपंच, सर्व महिला सदस्य, ग्रामसेविका, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशासेविका व ग्रामस्थ यांच्याकडून घेतली. 
         यावेळी परिविक्षाधीन खटाव प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसिलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युनुस शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष मोरे, सरपंच ललीता कदम, सर्व महिला सदस्या मा.सरपंच शिवाजीराव कदम, एस.के.कदम सर, मा.चेअरमन मधुकर कदम, शरद कदम, छगन कदम, ग्रामसेविका धनश्री गमरे, आरोग्य सेविका जंगम मॅडम, आरोग्य सेवक राऊत, मुख्याध्यापिका कुंदप मॅडम, उपशिक्षिका सुतार मॅडम, अंगणवाडी सेविका, आशासेविका, पदाधिकारी, अधिकारी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा