Breaking

रविवार, ६ जून, २०२१

श्री गणपती फार्मसीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न


श्री गणपती फार्मसीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
            
         टेंभुर्णी : अकोले खुर्द ता. माढा येथील  श्री गणपती फार्मसीमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. 
          " हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा" या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे .त्यामुळे 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. 
        यावर्षी कोरोना संकटातून मार्ग काढत श्री गणपती फार्मसीत शिवराज्याभिषेक साजरा  करताना प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी शिवाजी महाराजांबद्दल आपले विचार व्यक्त केले, भाषणाची सुरुवात" प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करत केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक बद्दल माहिती सांगितली व शेवटी "न भुतो न भविष्यती" असा राजा महाराष्ट्रात होऊन गेला. हे सांगत शेवट केला.
         यावेळी संस्थेचे सचिव डॉ.आर.डी.बेंदगुडे अध्यक्ष अॅड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, तसेच प्रा. स्वाती पाटील प्रा.  धनाजी माने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा