*तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे कॅनलवर ब्लास्टींगचे काम करत असणाऱ्या युवकाचा ब्लास्टींग मध्ये मृत्यू*
तुळजापूर तालुक्यातील सांवरगाव येथील मजूर कॅनलवर ब्लास्टींगचे काम करत असताना ब्लास्ट का होत नाही हे पाहण्याकरीता गेल्यावर अचानक ब्लास्ट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना सांगवी मार्डी येथे दि.७ जुन रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झाली.
अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी (आई ) यांचा मुलगा (मयत) संतोष गणपती माळी वय ३८ वर्ष रा. सावरगाव दि.७ जून रोजी दुपारी 4 वाजण्याचे सुमारास उजणी नदीवरील कँनल मसला ते सिंदफळ या कामावर सांगवी (मार्डी) शिवारात कॅनलवर ब्लास्टींगचे काम करत होता त्या ठिकाणी कामावर संतोष मारडकर व तसेच राजस्थानचे मजुर शंकर सुभाष , ओम व कंपनीचे तसेच पाठबंधारे विभाग तुळजापुर कार्यालयाचे कर्मचारी हजर होते संतोष यांने ब्लास्ट करण्यासाठी घेतलेला होता यामध्ये जिलेटीनच्या कांड्या टाकुन ब्लास्ट करत असताना ब्लास्ट का होत नाही, हे पहाण्यासाठी स्व:ताच स्फोटक लावले असतानाही स्फोट का होत नाही,हे स्फोटक लावलेल्या ठिकाणी हायगाईचे व निष्काळजीपणाचे क्रत्य करुन पहाण्यासाठी गेला आसता आचानक स्फोट झाला त्यामध्ये दगड उडुन संतोषच्या छातीवर ,पोटावर,डोक्यात,हातावर पायावर व सर्व अंगावर दगड लागुन गंभार जखमी होवुन मयत झाला आहे. मयत संतोष गणपती माळी यांच्या पच्छात आई,एक मुलगा, एक मुलगी , असा परिवार आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा