Breaking

मंगळवार, ६ जुलै, २०२१

करमाळा तालुका भाजपा कडून 12 आमदारांच्या निलंबनाचा निषेध*


*करमाळा तालुका भाजपा कडून 12 आमदारांच्या निलंबनाचा निषेध*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
 
      करमाळा तालुका भाजपा कडून 12 निलंबित केल्याबद्दल आघाडी सरकारचा निषेध करत निलंबन मागे घेण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
       भाजपच्या आमदारांनी ओबीसीचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्याचे प्रश्न आदी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आक्रमकपणे आवाज उठविला. राज्यात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या  महाविकास आघाडी सरकारने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले , ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप  भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केला आहे. भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
       हे निवेदन करमाळा तहसील कार्यालय येथे मंगळवारी दिनांक 6  रोजी  नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांचेकडे भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे  मार्गदर्शनाखाली  देण्यात आले.
 सदर घटना ही  लोकशाही ला काळीमा फासणारी आहे  व असंविधानीक आहे,  महाआघाडी  सरकारच्या या दडपशाही कृत्याचा  भाजपा कार्यकर्त्यांनी  जाहीर निषेध केला. 
यावेळी जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे ,जिल्हा सरचिटणीस किरण बोकन ,तालुका उपाध्यक्ष रामा  ढाणे , दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब होसिंग, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे-पाटील, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष हर्षद गाडे, शहराध्यक्ष ऋषिकेश फंड, रामदास गायकवाड, पुष्पक ढेरे, राजेंद्र गुंड विजय शिंदे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा