*संत निरंकारी चरिटेबल फाउडेंशन यांच्या वतीने आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात बिट टाकळी (बे.) येथे 585 वृक्षांचे भव्य वृक्षारोपन संपन्न*
दि. 25/07/2021 - उस्मानाबाद संत निरंकारी चरिटेबल फाउडेंशन सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असते. परम पुज्य सदगुरु माताजी सुदिक्षाजी महाराज यांच्या आशिर्वादाने व आदेशाने तसेच वन विभाग यांच्या सहाय्याने बिट टाकळी (बे.) येथे 585 वृक्षाचे वृक्षारोपन संपन्न झाले.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी मा. गणेश माळी साहेब, तहसिलदार उस्मानाबाद यानी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले संत निरंकारी चरिटेबल फाउडेंशन तर्फे आज या ठिकाणी थोर, उदात्त्त उपक्रम राबवत आहे. ही आज काळाची अतिशय निकडीची गरज आहे. संत निरंकारी मंडळ नेहमी सामाजिक कार्यात भाग घेउन साधु संतानी सांगीतलेल्या मार्गाचा अवलंब करते.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी प.पु. इंद्रपाल नागपालजी (झोनल इंचार्ज सोलापूर) यानी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले संत निरंकारी चरिटेबल फाउडेंशन या ठिकाणी 585 रोपे लागवड तसेच या रोपाना तिन वर्ष संर्वधनाची सेवा करेल. संकटसमयी परम पुज्य सदगुरु माताजी सुदिक्षाजी महाराज यांच्या आशिर्वादाने व आदेशाने मंडळ सेवा करेल.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी शाखा मुख्री प.पु. शाहुराज दिरगुळे जी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले संत निरंकारी मंडळाच्या शाखा आठही तालुक्यात आहेत आमचा सर्वाचा संकल्प आहे की उस्मानाबाद जिल्हयामध्ये कमात कमी 10000 वृक्षांचे वृक्षारोपन करणार याचाच भाग या ठिकाणी 585 रोपे लागवड संपन्न झाले.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी मा. गणेश माळी साहेब, तहसिलदार उस्मानाबाद, मा. सौ.प्रियंका लोखंडे मॅडम, नायब तहसिलदार उस्मानाबाद, मा. घोडके साहेब, मा. लोखंडे साहेब, मा. सुतार साहेब, वन अधीकारी उस्मानाबाद, मा. राजाभाउ जाधव उस्मानाबाद तसेच संत निरंकारी मंडळाचे प.पु. इंद्रपाल नागपालजी (झोनल इंचार्ज सोलापूर), सोलापुर चे सेवादल संचालक प.पु. कालीदास कोरे जी, शाखा मुख्री प.पु. शाहुराज दिरगुळे जी, सेवादल संचालक प.पु.विनोद अलकुंटे जी, सेवादल शिक्षक प.पु.संजय साळुके जी, शाखेचे महापुरुष् व बहनजी उपस्थित होते.
शेवटी राहुल अलकुंटे यानी संत निरंकारी चरिटेबल फाउडेंशन तर्फे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवराचे व साध्सगंत चे आभार मानले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा