*संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन च्या पद निवडी व सत्कार संपन्न*
तुळजापूर
संत रविदास युवा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांचे आदेशानुसार देवाप्पा शिंदे (प्रदेशाध्यक्ष)यानीं तुळजापूर तालुक्याच्या पद निवडी केल्या असून येथील बालाजी भाऊ कांबळे यानां तुळजापूर तालुकाध्यक्ष,मनोज शिंदे तालुका युवक संघटक व रघुनाथ कांबळे तालुका युवक सचिव आदींच्या निवडी केल्या आहेत.
त्याबद्दल बालाजी भाऊ कांबळे यानीं आपली जबाबदारी समजून (दि.१८)रोजी शहरातील संत रोहिदास सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात रघुनाथ कांबळे व मनोज शिंदे यांचा फेटा बांधून, शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी दलित युवक आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कांबळे,
संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनचे नुतन ता.अध्यक्ष बालाजी भाऊ कांबळे,भारीपचे शशिकांत गायकवाड, शहाजी वाघमारे (माजी नगरसेवक), नागेश गायकवाड, गोरख भाऊ पारधे,
शंकर गायकवाड, पत्रकार संजय गायकवाड, आप्पा गायकवाड, आकाश आप्पा गायकवाड, सुनिल वाघमारे, विठ्ठल गायकवाड, रुषीकेश कांबळे,
मनोज शिंदे,रघुनाथ कांबळे, सखाराम गायकवाड तसेच नागरिक उपस्थीत होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा