Breaking

गुरुवार, २९ जुलै, २०२१

काक्रंबावाडी येथील शेतीशाळेस गावातील शेतकऱ्यांचा उस्फुर्त असा प्रतिसाद.....*



*काक्रंबावाडी येथील शेतीशाळेस गावातील शेतकऱ्यांचा उस्फुर्त असा प्रतिसाद.....*


 *तुळजापूर :-* काक्रंबावाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत आणि कोळेकर महेश मित्रपरिवार काक्रंबावाडी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली उपस्थितीत पार पडली शेतीशाळा.
         काक्रंबावाडी येथे शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. काक्रंबावाडी येथील कोळेकर महेश मित्रपरिवार यांनी गावातील समस्त शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करून शेतीशाळा चे महत्व लक्षात घेऊन त्याचा वापर आपल्या दैनंदिन शेतीविषयक कार्यात करावा हे आवाहन केले असता गावातील लोकांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली.
       या शेतीशाळेच्या अंतर्गत सोयाबीन पिकावरील कीड ,आळी नियंत्रण आणि फुले व शेंगांची घ्यावयाची काळजी तसेच अंतर मशागत व औषध फवारणी यावर मार्गदर्शन करण्यात आले.



      कोणत्याही पिकांवर औषध फवारणी करताना कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांनी पोशाख परिधान करावयाचा कशाप्रकारे आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घ्यायची. घातक आणि विषारी औषधांमुळे आपल्या आरोग्यावर कसा दुष्परिणाम होतो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. चार्ट द्वारे माहिती देण्यात आली. कीड नियंत्रण आणि पीक जोपासना यावर ही मार्गदर्शन करण्यात आले.
        यावेळी गावातील शेतकरी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात आलेल्या अधिकारी वर्गाने समस्त कोळेकर महेश मित्रपरिवार व काक्रंबावाडी येथील गावकऱ्यांचे आभार मानले.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा