Breaking

गुरुवार, २९ जुलै, २०२१

भैरवनाथ शुगर आलेगाव कारखान्याच्या मिल रोलर पूजन समारंभ संपन्न*


*भैरवनाथ शुगर आलेगाव कारखान्याच्या मिल रोलर पूजन समारंभ संपन्न*

टेंभुर्णी  प्रतिनिधी - माढा तालुक्यातील टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याच्या 2021- 22 या हंगामासाठी मिल रोलर  पूजनाचा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता कारखान्याचे  चेअरमन शिवाजीराव सावंत यांच्या  शुभहस्ते व कारखान्याचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे पूजन करण्यात आले .
यावेळी  कारखान्याचे जनरल मॅनेजर सुरेश पाटील , असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ , ऊस पुरवठा अधिकारी तानाजी कदम,  अकाउंटचे काळे, व वडोली चे उपसरपंच तानाजी गाडे पाटील नरसाळे, तांबे चे माजी चेअरमन भजनदास खटके, शिवसेनेचे संतोष ढवळे , चव्हाण वाडी चे माजी उपसरपंच भागवत खडके ,बाळासाहेब बिचितकर , भारत जगताप, व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते  सर्व खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा