विद्यार्थी हित समोर ठेवून शिक्षकांनी आदर्श युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत .... माजी प्रा. आर डी पवार .
टेंभुर्णी येथील रहिवासी व करकंब ता.पंढरपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेचे पर्यवेक्षक दादासाहेब यशवंत पिसाळ हे इंग्रजीचे सहशिक्षक ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.यानिमित्त प्रशालेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य आर.डी.पवार हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव बुगड हे होते.
यावेळी आर.डी.पवार,सहशिक्षक शंकर गायकवाड,विद्यार्थिनी श्रद्धा वेळापूरकर व सानिका टेके आदींनी पर्यवेक्षक दादासाहेब पिसाळ यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली.शेवटी दादासाहेब पिसाळ यांच्या आभारपर मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास माजी प्राचार्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.सरचिटणीस आर.डी.पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर कार्यक्रमास कारखान्याचे माजी संचालक नरसाप्पा देशमुख,सचिव अविनाश देवकाते,उपाध्यक्ष दिलीप पुरवत,स्कुल कमिटीचे अध्यक्ष संजीव म्हेत्रे,मुख्याध्यापिका संगिता करमाळकर यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक,पालक,विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
* दादासाहेब पिसाळ यांची इंग्रजीचे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून पंढरपूर तालुक्यात ओळख असून शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात प्रसिध्द वक्ते म्हणून ही ते जनमाणसात सुपरिचीत आहेत.*
सत्कारास उत्तर देताना दादासाहेब पिसाळ यांनी सांगितले की,शाळा ज्ञानमंदिर आहे. विद्यार्थी हे त्या मंदिरातील दैवत असून शिक्षक पुजारी आहे.हे तत्व उराशी बाळगून ३४ वर्षाच्या सेवेत ते तंतोतंत आचरणात आणण्याचा प्रयत्न केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा