Breaking

गुरुवार, २२ जुलै, २०२१

उजनी धरणातील पाण्याची पातळी मायनस (-) मधून प्लस (+) मध्ये सुरू......


उजनी धरणातील पाण्याची पातळी मायनस (-) मधून प्लस (+) मध्ये सुरू......
 बेंबळे ।प्रतिनिधी।              ..

               सोलापूर जिल्ह्याची भाग्य वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्याची पातळी दि.२२जूलैच्या सायंकाळपासून मायनस (- उणे)  कडून प्लस( + अधिक) कडे जाण्यास सुरुवात झालेली आहे.   
       वृत्तांत असा की मागील तीन ते चार दिवसापासून पुणे जिल्ह्यातील मावळ भाग, भीमाशंकर चे डोंगर, लोणावळा परिसराचा पश्चिम भाग व धरणाच्या विस्तृत लाभक्षेत्र परिसरात दमदार पाऊस सुरू झालेला आहे. यामुळे मुळा,मुठा ,पवना, इंद्रायणी इत्यादी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली असून बंडगार्डन व दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढू लागला आहे. या अनुकूल परिस्थितीमुळे  यावर्षी मे 21 चे अखेरीस    उणे( -)23% पातळीत गेलेल्या उजनीच्या पाण्यामध्ये आज अधिक + 00.08 टक्के पाणी साठा झालेला आहे, व यामध्ये आता दिवसेंनदिवस वाढच होणार आहे .
          मागील 10-12 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला तरी पुणे जिल्हा व संपूर्ण भीमा खोरे मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत नव्हती. सुदैवाने मागील पाच-सहा दिवसात उजनीच्या वरील असलेल्या 18 धरण क्षेत्रात चांगल्या दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी तीन महिन्याच्या पावसाळी हंगामात उजनी धरण 100% भरेल व अपेक्षित पाणीसाठा होईल हे निश्चित .
    मागील वर्षी 18 जुलै 2020 रोजी उजनी धरण मायनस(- )मधून प्लस(+ )मध्ये आले होते. यावर्षी २२जूलै म्हणजे चार दिवस उशिरा पाणीपातळी  प्लस(+ )मध्ये आलेली आहे. सुदैवाने यावर्षी उजनीच्या वरती असलेल्या 18 धरणापैकी 7 धरणामध्ये सध्या 50 टक्के पेक्षा जास्त पाणी साठा आहे, यातच आता दमदार पावसामुळे ही सर्व धरणे लवकरच 100% टक्के भरतील हे निश्चित.  त्यानंतर दौंड येथून भीमा नदी येणाऱ्या पाण्याचा विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होईल व उजनी धरण 100 टक्के भरून भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण होइल अशी आगामी दोन महिन्यात अवस्था राहणार असे वाटते.

 दिनांक 22 जूलै 2021 रोजी उजनीची
 सायंकाळची स्थिती......
 ......एकूण पाणी पातळी 491. 42 मिटर.
 ....एकूण साठा 1805. 82 दशलक्ष घनमीटर.
........              ( 63 .71 टी.एम.सी.).
.... उपयुक्त साठा + 1.07 दशलक्ष घनमीटर.
                        (+0.09 टी.एम.सी.).
 ....टक्केवारी   + 00.08 %  टक्के .
  ...  दौंड येथून येणारा विसर्ग...
                                        11080 क्यूसेक्स.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा