Breaking

रविवार, २५ जुलै, २०२१

दयाल धानोरा येथील आठ सागवान झाडांची कत्तल* *१५६०० रुपयांचे सागवान घेऊन तस्कर फरार*



*दयाल धानोरा येथील आठ  सागवान झाडांची कत्तल*                                                                                            *१५६०० रुपयांचे सागवान घेऊन तस्कर फरार*


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वनविकास महामंडळा च्या राखीव जंगलाच्या दयाल धानोरा तांडा येथील बिट क्र.२७२ मधील दि.२४ जुलै रोजी रात्रीला शिवणी निर्मल रस्त्याचा बाजूची मौल्यवान सागवणाची ८ सजीव झाडांची मशीन द्वारे कत्तल करून तस्करी  सागवान लाकूड घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शिवणी येथील दयाल  धानोरा तांडा गावलगत असलेल्या रस्त्याच्या बाजूला सागवान झाडांची कत्तल करण्यात आलेली त्याची झाडांची किंमत  १५६०० रुपयांची दाखवली जाते.याचे पी.ओ.आर.६/३९१ गुन्ह्याची नोंद करण्यात आली.तर या संदर्भात विभागीय व्यवस्थापक शंभरकर सहायक व्यवस्थापक जे.डी.पराड,यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.पटवेकर वनपाल,एन.एस.वाघमारे,के.पी.केंद्र,बी.एस.वडजे,व्ही. ए. मोरे.के.एम.वाट,वनमजुर, नागोराव मेंढके,सुभाष कोरेवाड,आदी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही केली.अशी घटना मागील काही दिवसात याच वनपरिक्षेत्र मंडळातील कंचली येथे ही झाडांची कत्तल करण्यात आली होती.मागील एकच महिन्यात ही दुसरी घटना झाल्याने या भागातील येणाऱ्या काळात वन जंगल तुटून भुई सपाट होईल अशी मत व्यक्त केले जात आहे.तर काल झालेल्या घटने संबधी दयाल धानोरा तांडा  येथील नागरिकांनी रोष व्यक्त केले आहे.तर या प्रकरणात संबंधित कर्मचारयांची हात मिळवणी असल्याची बोलले जात आहे.तर या प्रकरणाची गांमभिर्याने दखल घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच्या गस्ती साठी वाहनांची व्यवस्था करून देण्यात यावी.व या भागात जे मौल्यवान सागवाणाची तूट होत आहे.याला आळा बसेल असे स्थानिक व या शिवणी वन परिक्षेत्र मंडळातील वन्यप्रेमी कडून बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा