आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा नागरिकांची गैरसोय
माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तथा आरोग्यवर्धिनी केंद्र आलेगाव बुद्रुक येथे सध्या कोविड १९ लसीकरण चालू असून येथे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला दिसून येत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे लोकांची मोठी गैरसोय होत आहे
सद्यस्थितीत कोविड १९ या आजाराची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रभावी लसीकरण हाच एकमेव उपाय असून आलेगाव बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येणाऱ्या ४५ वर्षावरील लोकांना दि.१ जुलै रोजी आढेगाव ग्रामपंचायतीतून सकाळ १० वाजता लस घेण्यासाठी जाण्यास सांगितले. परंतु आरोग्य केंद्रात गेल्यानंतर दुपारी २ वाजलेनंतर येण्यास सांगितले सकाळी १० वाजताची वेळ आहे असे ज्येष्ठ नागरिकांनी तेथील कर्मचाऱ्यांना विचारले असता कर्मचारी समाधानकारक उत्तर न देता उद्धटपणे उत्तर देत होते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिवसभर बसावे लागेल बाहेरून येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोयही आरोग्य केंद्रात नसल्याने वयोवृद्ध लोकांना दिवसभर अन्नपाण्याविना थांबावे लागले त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या वयोवृद्धांची मोठी गैरसोय झाली.
त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात गवत मोठ्या प्रमाणात उगवले असून यामुळे इथे विंचू व साप असे दंश करणार्या प्राण्यापासून लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना धोका असून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. तसेच लसीकरणासाठी नोंदणी करताना सोशल डिस्टंसिंगचा कोणतेही नियम अटी पाळण्याची कोणतीही अट नसून इथे मोठी गर्दी करून नोंदणीकरण केले जात आहे. यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे असून आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा