हुतात्माच्या वडूज नगरीत पत्रकारांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण.
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अनेकांसोबत पत्रकारांचे ही योगदान आहे. याची जाणीव ठेवून वडूज ता. खटाव येथील हुतात्मा नगरीत जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.
सार्वजनिक वाचनालय म्हणजे गुरू, मार्गदर्शक व संस्कार देणारे केंद्र आहेत, याच उद्देशाने वडूज-पेडगाव रस्त्यावर बावीस वर्षांपूर्वी शासनमान्य व मुक्त वाचनालयाची १९९९ साली स्थापना केली. आज ही विविध पुस्तके, वृत्तपत्र वाचनाचा आनंद वाचकवर्ग घेऊ लागले आहेत. विशेषतः जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्यासाठी हे नगर वाचनालय म्हणजे वैचारिक बैठक निर्माण करणारे पवित्र स्थळ ठरले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगर वाचनालयाचे सोमनाथ बनसोडे, पी एन घाडगे, राहुल सजगणे व ग्रँथपाल शोभा काळे आदि मान्यवरांच्या उपस्थित जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मानवंदना देण्यात आली. या वेळी पेढे देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी चार ते सात या कालावधीत नगर वाचनालय सुरू असते अशी माहिती श्री बनसोडे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा