*चारुशीलाराजे युवा मंचच्या वतीने औंध ग्रामीण रुग्णालयात पोषक आहाराचे वाटप*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिम्मित श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली औंध ता. खटाव येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय तसेच सर्व कर्मचारी. ग्रामपंचायत आरोग्य सेवक, आशासेविका व पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
कोविड सारख्या महामारी मध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णाची सेवा करून लोकांसाठी काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. यावेळी श्रीमंत चारुशीलराजे युवामंच, राजू माने मित्र मंडळ व शुभम शिंदे मित्र मंडळ यांचा वतीने रुग्णलयातील रुग्णांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.सोनाली मिटारी, उपसरपंच दीपक नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण सर, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने. दीपक कदम, उमेश थोरात, ग्रा. सदस्य तानाजी इंगळे, शैलेश मीठारी, गणेश देशमुख, वहिद मुल्ला, गणेश हरिदास, संतोष जायकर, रमेश जगदाळे, सुखदेव इंगळे, पोलीस कर्मचारी कटरे दादा, पत्रकार रशीद शेख, ओंकार इंगळे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शुभम शिंदे म्हणाले की, येणाऱ्या काळात श्रीमंत चारुशीलाराजे युवा मंचच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमाबरोबर विविध कार्यक्रम राबविले जाणार असून आपल्या सर्वांच्या पाठींब्याची गरज असणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भरत यादव यांनी केले प्रास्ताविक श्रीपाद सुतार यांनी केले तर विशाल ओतरी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास श्रीमंत चारुशीलाराजे युवामंच, राजेंद्र माने मित्र मंडळ आणि शुभम शिंदे मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आदिसह औंध गावाचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा