*महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताबडतोब निष्कासित करा---बहुजन सत्यशोधक संघटनेच्यावतीने मोर्चा काढून मागणी*
******************************जा
: टेंभुर्णी/ प्रतिनिधी
टेंभुर्णी येथे बहुजन सत्यशोधक संघ च्या वतीने केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा वाजता करमाळा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
हा मोर्चा करमाळा चौका मधून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात व केंद्र शासनाचे विभाग घोषणाबाजी देत जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून टेंभुर्णी ग्रामपंचायत समोरील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे टेंभुर्णी बस स्थानकाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे टेंभुर्णी
पोलीस ठाण्यासमोर येऊन टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांना निवेदन देण्यात आले.
बहुजन सत्य शोधक संघटनेच्यावतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात प्रथम मागणी मध्ये एससी एसटी वरती होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात,अ) मागासवर्गीय दि. 07/05 2019 च्या शासन निर्णयानुसार रद्द केलेले 33% आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 17 5 2018 व 5/6/2018केंद्र सरकारच्या दिनांक 15 /6/ 2018 च्या आदेशाप्रमाणे मा. न्यायालयाचा अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीत. ब) मंत्रालयातील अधिनस्त अधिकाऱ्यांनी षडयंत्र करून मागासवर्गीय पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्या वर ॲट्रॉसिटी तसेच आरक्षण आधी नियम कलम अन्वये गुन्हा दाखल करावा. क ) मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी असलेले मागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीय यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना ताबडतोब निष्कासित करून मागासवर्गीय मंत्र्याची नियुक्ती करावी., मागासवर्गीय वरील जातीवादी अत्याचाराच्या केसेस चालवण्यासाठी तालुकास्तरीय न्यायालय निर्माण करावे., मंत्रिगट समितीच्या 2006 चा शिफारशीप्रमाणे ओबीसींना ही पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावे., ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मधील आरक्षणासाठी तत्काळ आयोग नेमावा., पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात., ईव्हीएम मशीन बंद न करणाऱ्या लोकशाहीविरोधी सरकारच्या विरोधात, शेतकरी व घरगुती वीज बिल माफ न करणाऱ्या सरकार विरोधात, ओबीसीची जातिनिहाय जनगणना न करणाऱ्या जातीवादी सरकारच्या विरोधात. जातीवादी सरकारचा वृद्धांमध्ये हा मोर्चा काढण्यात आला
यावेळेस, बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे, मातंग एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष राम भाऊ वाघमारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे टेंभुर्णी शहराध्यक्ष अनिल आरडे, बहुजन सत्यशोधक कर्मचारी संघ बापूसाहेब शिंदे, महावीर वजाळे, माळशिरस तालुका उपाध्यक्ष दादासाहेब दळवी, मालेगाव चे माजी सरपंच बबनजी किर्त, कोंढार भागाचे नेते नारायण गायकवाड, क्रांतीदीप लोंढे, लखन वाघमारे महेंद्र शिंदे,सतीश वाघमारे,सचिन झेंडे, दीपक लोंढे, पश्चिम म. सदस्य बहुजन सत्यशोधक संघ अनिल सरवदे,अध्यक्ष,महादेव गाडे, बापू माने, रवी धोत्रे करकंब अध्यक्ष,लखन वाघमारे,सुरेश वाघमारे, समाधान जाधव बाळासाहेब खरात आशिष लोंढे आदर्श लोंढे अन्य बहुजन सैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा