Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

बिलोली नगर परिषदेने पञिकेवर छत्रपती शिवाजीराजे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी निषेध करण्यात आला.


बिलोली नगर परिषदेने पञिकेवर छत्रपती शिवाजीराजे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी निषेध करण्यात आला.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

 बिलोली नगर परिषदेच्या वतीने 15 ऑगस्ट 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या रूपरेषा पत्रिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  एकेरी नावाने उल्लेख करण्यात आला तसेच या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावाने उल्लेख करण्यात आला होता.त्यामुळे जनतेच्या भावना दुखवल्या असून नगर परिषदेचे सबंधीत मुख्याधिकारी
 नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी येत्या दोन दिवसात सर्व कार्यकत्याच्या उपस्थितीत जाहिर लेखी माफी मागावी अन्यथा येत्या दोन दिवसात सर्व सकल मराठा
समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बिलोली तहसिलदार व पोलीस निरिक्षक बिलोली यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आले.

सदरिल निवेदनावर हणमंत रामतीर्थकर,राजू शिंपाळकर,जेजेराव कानोले,दत्ता जाधव,दिगाबंर देगलूरे,केदार ढगे,चक्रधर कोंडलापूरकर,बाजीराव कोंडलापूरकर,शिवाजी लामतलवारे,विकास जाधव, इंद्रजित तुडम्मे,प्रशांत अंकूशकर,प्रल्हाद पाटील,दिपक शिंदे,रियाज शेख आदींच्या साक्षऱ्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा