श्री गणपती बी. फार्मसी महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल
निकिता शहाजी भोसले ही कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने (९१.३१%)
मौजे अकोले खुर्द.ता.माढा येथील गणपती औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी. फार्मसी प्रथम वर्षे प्रथम सत्र चा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली.
स्वरांजली पंडित पाटील द्वितीय(९०.९०%) क्रमांक
निकिता शहाजी भोसले ही कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने (९१.३१%)तर स्वरांजली पंडित पाटील द्वितीय(९०.९०%) क्रमांकाने व साक्षी संतोष मोरे (९०.३७%) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. बी.फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, प्रा. मिसाळ सर, प्रा. भोसले मॅडम, प्रा. गुटाळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
साक्षी संतोष मोरे (९०.३७%) ही तृतीय क्रमांकाने
गणपती फार्मसीमध्ये यावर्षी कोरोनासारख्या महामारीतुन मार्ग काढत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक या दोन्ही प्रकारचे शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीने देण्यात आले.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाकडे वेळोवेळी कॉलेजने लक्ष केंद्रित केले आहे. कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या गुणांनी तसेच सर्वगुणसंपन्न कसा होईल याकडेच काॅलेज लक्ष केंद्रित करत आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी दिली सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲंड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी अभिनंदन केले.
*****************************************
***************/. . *************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा