बळीराम पाटील महाविद्यालयात प्रा.इंद्रजित राठोड व प्रा. किशनराव किनवटकर यांना श्रद्धांजली
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
बळीराम पाटील महाविद्यालयात प्रा इंद्रसिंग राठोड व प्रा. किशनराव किनवटकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांना आज महाविद्यालयात प्राचार्य डाँ एस.के.बेंबरेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाविद्यालयात प्रा इंद्रसिंग राठोड हे राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक होत. तसेच प्राध्यापक किशनराव किनवटकर हे व्यवसायिक अभ्यासक्रम विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. दोघांचेही महाविद्यालयाच्या जडनघडनीत व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते त्यांच्या जाण्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुःखातून बाहेर पडण्यासाठी परिवारास शक्तीबळ व उर्जा मिळो असे त्यांनी मत व्यक्त केल. व श्रद्धांजली अर्पण केली याप्रसंगी उपप्राचार्य जी. एस. वानखेडे प्रा. राजकुमार नेमानीवार डॉक्टर एस. आर. शिंदे प्रा.शेषराव माने डॉक्टर शुभांगी दिवे,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते माजी विद्यार्थी म्हणून डाँ. पंजाब शेरे यांनी आपले मत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा