Breaking

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या हस्ते नाभिक समाज सभागृह भूमिपूजन*संत सेना महाराज सभागृहासाठी 10 लाख आमदार फंड जाहीर



*आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या हस्ते नाभिक समाज सभागृह भूमिपूजन*



संत सेना महाराज सभागृहासाठी 10 लाख आमदार फंड जाहीर

श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त  विविध उपक्रम साजरे

तुळजापूर - श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुंभार गल्ली यथील आरक्षित जागेवर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते फलकाचे अनावरण आणि नियोजीत सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.


सराया धर्मशाळा येथे आज दि.3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता तुळजापूर पोलीस ठाणे निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडला,तसेच दि.4 सप्टेंबर रोजी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत गुलाल कार्यक्रम, महाआरती व नाभिक समाजरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सज्जन साळुंखे,विनोद गंगणे, शाम पवार, सुधीर कदम,ऋषिकेश मगर, आनंद कंदले, अविनाश गंगणे,गुलचंद व्यवहारे, निलेश रोचकरी,मिलिंद रोकडे, किशोर साठे,विजय कंदले,अभिजित कदम,नाभीक महामंडळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,जिल्हा सरचिटणीस दाजी आप्पा पवार,मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडित,ओबीसी जिल्हाध्यक्ष सुखदेव भालेकर,विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे,पत्रकार प्रशांत कावरे यांच्यासह तुळजापूर शहर व तालुक्यातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राणाजगजीतसिंह  पाटील म्हणाले की,श्री संत सेना महाराज नाभिक समाज सभागृहासाठी आमदार निधी मधून पहिल्या टप्प्यासाठी 10 लाख रुपये निधी घोषित केला असून यापुढेही आवश्यकता असल्यास निधी देणार असा आशावाद व्यक्त केला,तर नगरपालिकेच्या माध्यमातून नाभिक बांधवांना पुढील काळात सर्वोतपोरी मदत करण्यासाठी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व विनोद पिटु गंगणे यांना सूचित केले.


चौकट 

समाजरत्नांचा पुरस्कार देऊन गौरव

श्री सुमित पंडित पूजा पंडित औरंगाबाद, विठ्ठल गायकवाड उस्मानाबाद,सुरेश राऊत,
श्रीमती सविता क्षीरसागर, प्रकाश गवळी महाराज, विष्णु दळवी,प्रितेश डाके,पत्रकार अनिल आगलावे, प्रज्योत कावरे, कु.सुप्रिया बडोदकर, गार्गी कावरे यांना नाभिक समाजरत्न सेवा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा