Breaking

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

उद्योग मंत्री देसाई यांच्या कडे श्रीगोंद्यात MIDC व्हावी म्हणुन दुतारेंनी केली मागणी......



उद्योग मंत्री देसाई यांच्या कडे श्रीगोंद्यात MIDC व्हावी म्हणुन दुतारेंनी केली मागणी......


श्रीगोंदा - नितीन रोही


तालुक्यात औद्योगिक वसाहत लवकरात लवकर मंजूर करावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे  यांनी शुक्रवार दि.3 सप्टेंबर रोजी सोनई येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवेदनाद्वारे राज्याचे  उद्योग मंत्री व शिवसेना ज्येष्ठ नेते नामदार सुभाष देसाई यांच्याकडे केली .निवेदनात दुतारे यांनी म्हटले आहे की मुंबई , पुणे , पाठोपाठ लगतच्या शिरूर,  पारनेर , नगर , राहुरी तसेच दौंड या भागात औद्योगिक वसाहत उभी राहिली परंतु श्रीगोंदा , कर्जत , जामखेड या पट्यामध्ये औद्योगिक वसाहत नसल्याने येथील बेरोजगार तरुणांना शेजारच्या औद्योगिक वसाहती मधे जावे लागले श्रीगोंदा तालुक्यात पाणी  , वीज , रेल्वेमार्ग , हायवे आदी सुविधा असताना औद्योगिक वसाहत मात्र होऊ शकली नाही औद्योगिक वसाहती चे गाजर यापूर्वीच्या आमदारांनी जनतेला वेळोवेळी दाखवून निवडणुका जिंकल्या परंतु औद्योगिक वसाहती चे आश्वासन पूर्ण झाले नाही तरी आपण औद्योगिक वसाहत ची गरज लक्षात घेता लवकरात लवकर औद्योगिक वसाहत श्रीगोंदा तालुक्यात होण्यासाठी मार्ग काढावा आशी मागणी दुतारे यांनी केली आहे यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख ,  संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर,  जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे आदि उपस्थित होते. या बैठकीसाठी तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्यासमवेत शिवसेना ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख व  
युवासेना तालुकाप्रमुख निलेश गोरे उपस्थित होते .नामदार सुभाष देसाई यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार औद्योगिक वसाहत होण्यासाठी लवकरच निर्णय घेईल असे आश्वासन दिले शासन पातळीवर याबाबत तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले दरम्यान औद्योगिक वसाहत प्रश्न उद्योग मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने तालुक्यातील जनतेने शिवसेनेचे कौतुक केले आहे तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर 
शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे तालुक्यातील जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणांमध्ये राबवून शिवसैनिकांची मने जिंकली आहेत औद्योगिक वसाहत प्रश्न मांडल्याने देखील शिवसैनिकांसह जनतेच्या मनात तालुकाप्रमुख दुतारे यांनी अल्पावधीत स्थान मिळवले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा