Breaking

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

श्री शिवशुंभ ट्रस्ट आणि वालचंदनगर पोलिस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने ३०० रक्तदात्यांनी केले रक्तदान


पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख IPS संकल्पनेतून
श्री शिवशुंभ ट्रस्ट आणि वालचंदनगर पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील आजपर्यंत रक्तदान शिबिराचे रेकॉर्ड ब्रेक ;३०० रक्तदात्यांनी केले.

प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के

पुणे जिल्ह्यात मागील २ वर्षापासून आपण पाहत आला आहेत शिवशंभू ट्रस्ट आणि सर्वच
सामाजिक संस्था , प्रतिष्ठान यांच्या सोबत शिबीर घेऊन गरजेच्या वेळी लोकांना रक्त उपलब्ध होत आहे असा विश्वास बसता लोकांनी ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यायला चालू केले हे आपण पाहत आहात,

अलीकडच्या काळामध्ये कोरोनाची तिसरा लाट व कोविड लसीमुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा जाणवू लागला होता हेच पाहता शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे उपाध्यक्ष विवेक शिंदे , रणजित गायकवाड, यांनी वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन.लातुरे साहेब यांना विनंती केली असता त्यांनी लगेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे कर्मचारी व जवळच्या मित्र परिवाराला सांगितले, आणि सर्वजण कामालाही लागले,
सकाळी शिवशंभू ट्रॅस्टचे संस्थापक/ अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे व पत्नी प्रीती सुर्वे यांनी रक्तदान करून शिबिरास केली.सोबतच सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांनीही ‌ रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले.हे बघत असतानाच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुध्दा पाहता पाहता तालुक्यातील रक्तदान शिबिराचा रेकॉर्ड मोडत ३०० रक्तदान त्यांनी रक्तदान करून आपल्यालाही सामाजिक कार्याची जण आहे हे यावेळी दाखवून दिले. सर्व कार्यक्रम कोरोनाच्या नियमांचे पालन करून व्यवस्थितरीत्या पार पडला,लातुरे साहेब,व विनोद पवार यांनी रक्तदात्त्यांचे यावेळी आभार मानले,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा