Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

कणसेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन


कणसेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन 
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती कल्पना खाडे यांच्या फंडातून व विजय खाडे यांच्या प्रयत्नातून कणसेवाडी ता. खटाव येथे ३० लाख रुपयेची विविध विकास कामांचे भूमिपूजन समाजकल्याण सभापती कल्पना खाडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जूनराव खाडे, नियोजन समिती सदस्य नंदकुमार मोरे, मुन्ना उर्फ विजय खाडे, उपसरपंच अनिल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      एनकूळ कणसेवाडी ता खटाव येथे बौध्द वस्ती गटार बांधणे, पाच हायमास्ट पोल उभारणे, जि प शाळा दुरुस्त करणे, गणेश मंडळ सभामंडप, मदने वस्ती सभामंडप, लवळे व खाडे वस्ती जि प शाळा दुरुस्त करणे आदि विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
         कार्यक्रमास ग्रा पं सदस्या आक्काताई डोईफोडे, महादेव खाडे, मा.सरपंच शालन खाडे, उपसरपंच धनाजी लवळे, उत्तम जाधव, रशीदभाई शेख, हारूण भाई शेख, बाळासो खाडे, हणमंत खाडे, वसंत खाडे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा