Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

*तेर येथे केंद्र सरकारच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापण कामास पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल- सौ,अर्चनाताई पाटील*



*तेर येथे केंद्र सरकारच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापण कामास पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल- सौ,अर्चनाताई पाटील*



तेर येथे प्रमुख पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, तेर ग्रामपंचायतीचा  घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून गावात सांडपाणी व तसेच घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. केंद्र सरकार कडून यासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन दि.१५ ऑक्टोबर रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्याहस्ते केले जाणार आहे. 

यावेळी नृसिंह वेस येथील जि. प.कन्या शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमीपूजनासह भूमिगत गटार बांधकामाचे प्रातिनिधिक स्वरूपात सौ.अर्चनाताई पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.

याप्रसंगी जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, तांत्रिक सल्लागार बळीराम केंद्रे, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, पद्माकर फंड, जुनेद मोमीन, भास्कर माळी, विजयसिंह फंड, विठ्ठंल लामतुरे, प्रवीण साळुंके यांची उपस्थिती होती.



प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा