वडूज येथील पाळीव मोकाट फिरणाऱ्या जनावरांनाचा बंदोबस्त करा
अन्यथा जनावरे नगरपंचयातीत आणून बांधणार - शहाजीराजे गोडसे
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
वडूज शहरात सध्या पाळीव परंतु मोकाट अश्या गाढवे, डुक्करे, कुत्री अश्या पाळीव परंतु मोकाट प्राण्यांमुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा नगरपंचयातीने तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा ही सर्व जनावरे नगरपंचयातीत आणून बांधणार अश्या आशयाचे निवेदन वडुजचे मुख्याधिकारी ओंकार पंडित यांना शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाच्यावतीने देण्यातआहे. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे, सचिन फडतरे, प्रमोद देशमुख, सोमनाथ काळे आदि उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या वडूज शहरात पाळीव परंतु मोकाट अश्या जनावरांचा नागरिकांना उपद्रव होत असून काही वेळा या जनावरांनामुळे छोटे मोठे अपघात होऊन अनेक नागरिक जखमी होत आहेत. हि मोकाट जनावरे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे नगरपंचयातीने अश्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा येणाऱ्या पंधरा दिवसात बंदोबस्त न झाल्यास ही जनावरे शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय मिळण्यासाठी नगरपंचयात कार्यालयात बांधून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा