Breaking

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

सीएफआय व पीटीए ची जिल्हास्तरीय मिटिंग संपन्न.*



*सीएफआय व पीटीए ची जिल्हास्तरीय मिटिंग संपन्न.*


कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया व प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन ची जिल्हास्तरीय बैठक सीएफआय चे राष्ट्रीय सचिव अलोक दीक्षित (दिल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत अष्टभुजा अकॅडमी येथे संपन्न झाली. प्रथम नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते अलोक दीक्षित यांचे तुळजापूर शहरात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात अनेक कोचिंग क्लास संचालक आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. कोचिंग क्लास संचालकांचा आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी सीएफआय व पीटीए या संघटनांनी विविध वित्तीय संस्था, विमा कंपन्या, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांशी करार केले आहेत. याद्वारे कोचिंग क्लास संचालकांना अल्प व्याजदरात कर्जपुरवठा, पालकांना क्लासची फीस देण्यासाठी शून्य टक्के दराने कर्ज, अल्प दरात कोचिंग क्लासचे App, आरोग्य विमा इ. योजनांचा समावेश आहे. यावेळी डॉ. प्रशांत कुलकर्णी, सीएफआय व पीटीए चे राज्याध्यक्ष विजय पवार, रविकांत शितोळे, वैजिनाथ मिटकरी व सीएफआय चे राज्य सहसचिव डॉ. आनंद मुळे उपस्थित होते. बैठकीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील कोचिंग क्लास संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या नियोजनासाठी आण्णासाहेब मात्रे, प्रताप मोरे, विकास जाधव, राम माने, राहुल बोबडे, शिवदर्शन उकरंडे, उमाजी सरवदे, जयवंत काशीद, अतुल पवार, संजय सुरवसे, परमेश्वर ढेकरे, किरण वाघ यांनी परिश्रम घेतले.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा