Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

टेंभुर्णी येथील बिपिन कृषी भांडार सह मुकुंद कृषी भांडार दोन्ही दुकानाचे बियाणे विक्री लायसन रद्द



टेंभुर्णी येथील बिपिन कृषी भांडार सह मुकुंद कृषी भांडार दोन्ही दुकानाचे बियाणे विक्री लायसन रद्द


टेंभुर्णी : -टेंभुर्णी येथील दोन कृषी भांडारच्या दुकानावर जिल्हा कृषी अधिकारी तथा जिल्हा परवाना अधिकारी व त्यांच्या पथकाने छापा टाकून दोन दुकानाचे परवाने कायमस्वरूपी निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली असून या कारवाईचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.  

बिपिन कृषी सेवा केंद्र व मुकुंद कृषी सेवा केंद्र अशी या दोन दुकानाची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तपासणी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी टेंभुर्णी येथील कृषी सेवा केंद्राची तपासणी केली.यावेळी दोन्ही कृषी केंद्रांमध्ये बियाणे नियंत्रण कायदा १९८३ धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले.तपासणी दरम्यान बियाणाचा साठा पुस्तक न ठेवणे, बियाणाचे साठा नमूद न करणे,बियाणे चढ्या भावाने विकणे,बियाणाची योग्य पावती शेतकऱ्याला न देणे व इतर सर्व बियाणे नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन करून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी या बिपिन कृषी भांडार व मुकुंद कृषी भांडार दोन्ही दुकानाचे बियाणे विक्री लायसन रद्द केले आहे.

*चौकट*
या परिसरातील शेतकऱ्यांनी खते,औषधे व बियाणे या संदर्भात काही तक्रार असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी कार्यालयाला संपर्क करावा असे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा