*१६ सप्टेंबर २०२१ रोजी स्मार्ट लसिकरण केंद्र नगर परिषद शाळा क्र ३ येथे कोवीड लसीकरण शिबिर संपन्न*
तुळजापूर- उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर व नगरपरिषद कार्यालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ सप्टेंबर २०२१ सकाळी ९:०० वाजे पासुन नगर परिषद शाळा क्र ३ तुळजापूर खुर्द येथे वय वर्षे १८ पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी कोवीशील्ड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस ४३१ जणांना देण्यात आला.
लसीकरण ला येताना सोबत आपले आधार कार्ड व मोबाईल घेऊन यावा.
तरी तुळजापूर खुर्द शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहान नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी,नगरसेवक पंडीतराव जगदाळे,नगरसेविका सौ मंजुषाताई देशमाने,उपजिल्हा रुग्नालय समिती सदस्य आनंद (दादा) कंदले व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक चंचला बोडके यांनी केले आहे.सदरील लसिकरणा मध्ये ४३१ जणांचे लसीकरण करण्यात आले. सदरील कार्यक्रमास मुख्याध्यापक मोटेसर तसेच पालिका कार्यालय अधिक्षक श्री पाठकसाहेब,कर निरीक्षक श्री कांबळे साहेब,माळी साहेब आदी उपस्थात होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा