विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर च्या पहिल्या पाच साखर पोत्याचे पुजन संपन्न-
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.युनिट नं.1 पिंपळनेर या कारखान्याचा 2021-22 चा 21 वा गाळप हंगाम सुरू झालेला असून या गळीत हंगामात उत्पादीत पहील्या पाच साखर पोत्याचे पुजन व्हाईस चेअरमन वामनभाऊ उबाळे व संचालक पोपट चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सुरूवातीस कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन संचालक प्रभाकर कुटे यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे कारखान्याने युनिट नं.1 पिंपळनेर येथे ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये 20 लाख मे.टन गाळप करणेचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे 32 हजार 696 हेक्टर क्षेत्राची नोंद आहे. सर्व ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कामावर हजर झालेली असून गळीत हंगामास जोमाने सुरू झाली असल्याची माहीती संचालक तथा जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली.
सदर प्रसंगी जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, व्हाईस चेअरमन वामनभाऊ उबाळे,संचालक पोपट चव्हाण,प शिवाजी डोके, रमेश येवलेपाटील, प्रभाकर कुटे, पांडूरंग घाडगे, वेताळ जाधव,लाला मोरे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव, वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे, जनरल मॅनेजर(प्रोसेस)पी.एस. येलपले, जनरल मॅनेजर (एच.आर.) पी.ए.थोरात, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, डे.चिफ केमिस्ट ए.के.जगताप, सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे ,सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा