Breaking

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून 12.5 टक्के ऊस वाहतूक दर वाढ जाहीर – आ.बबनराव शिंदे






















विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून 12.5 टक्के ऊस वाहतूक दर वाढ जाहीर – आ.बबनराव शिंदे



बेंबळे प्रतिनिधी/ विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुक करणा-या वाहन
मालकांना 12.5 टक्के ऊस वाहतूक दर वाढ देण्यात येणार असल्याची माहीती
कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, साखर कारखान्यांकडे ऊस वाहतुक
करणा-या वाहन मालकांना यापूर्वी सन 2014 मध्ये ऊस वाहतुक दरामध्ये दरवाढ
दिलेली होती. त्यानंतर आजअखेर डिझेल दरामध्ये झालेली दरवाढ, स्पेअर पार्ट
दरवाढ, ड्रायव्हर पगार व इतर बांबीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे वाहन
मालकांकडून ऊस वाहतुक दरामध्ये दरवाढ मिळणेबाबत वारंवार मागणी होत
होती.या सर्व बांबीचा विचार करून ऊस गाळप हंगाम 2021-22 पासून विठ्ठलराव
शिंदे कारखान्याकडे ऊस वाहतुक करणा-या वाहन मालकांना ऊस वाहतुक दरात 12.5
टक्के वाढ देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे अशी माहीती
आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
विठ्ठ्लराव शिदे कारखान्याने शेतक-यांना ऊस बीले वाहन मालकांना
ॲडव्हान्स, कमिशन डिपॉझीट वेळेत देणेची परंपरा कायम राखलेली असल्याने
शेतकरी व वाहन मालक यांची कारखान्याविषयक विश्वासअर्हता वाढलेली आहे.
सभासद शेतकरी, ऊस पुरवठादार व वाहन मालक यांनी प्रति वर्षाप्रमाणे
2021-22 गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.शिंदे
यांनी याप्रंसगी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा