Breaking

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

उजनीच्या 16 दरवाजातून 40 हजार क्युसेक्स पाणी भीमा नदी पात्रात सोडले.... भीमा नदीला पूर सदृश्य परिस्थिती...



उजनीच्या 16 दरवाजातून  40 हजार क्युसेक्स पाणी भीमा नदी पात्रात सोडले....
 भीमा नदीला पूर सदृश्य परिस्थिती...

 बेंबळे ।प्रतिनिधी।                

                   रविवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 11 वाजता उजनी धरणातून  16 गेट्समधुन 40 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेले आहे, दरम्यान वीर धरणातून नीरा नदीत पाच हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे नरसिंगपूर येथील नीरा-भीमा संगम पासून पुढे भीमा नदी पात्रात  पस्तीस हजार क्युसेक्स विसर्गाने प्रवाही पाणी वाहत असून भीमा नदीला महापूर आलेला आहे व पूर नियंत्रण यंत्रणा कटाक्षाने लक्ष ठेवून आहे. पुणे जिल्ह्यात तसेच उजनी धरणाच्या परिसरात सध्या होत असलेल्या पावसामुळे 10 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता उजनी धरणात 110.59% पाणी पातळी व 122. 91 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. तसेच उजनीच्या वरील 19 पैकी 17 धरणे शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालेली आहेत व कांही ठिकाणांहून पाच ते सात हजार क्युसेक्स पाणी खाली सोडून देण्यात येत आहे. त्यामुळे बंडगार्डन येथून 8721 क्युसेक्स विसर्गाने तर दौंड येथून भीमा नदीत 14 हजार 750 क्युसेक्स विसर्गाने उजनी धरणात पाणी येत आहे. नियोजित 111.23  टक्के पाणीसाठा व 123.28 टीएमसी पाणी साठा होण्यासाठी फक्त 1 टक्के पाणी कमी आहे परंतु पातळी स्थिर ठेवण्यासाठी दौंड येथून येणार्या पाण्याच्या विसर्गाचा  विचार  करून धरणाच्या 16 मोर्यातून 40 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे, तसेच उजनीच्या मुख्य कालव्यातून 500 क्युसेक्स, भीमा सीना जोड कालवा (बोगद्यातून )150 क्युसेक्स, सीना माढा सिंचन योजनेतून 144 क्युसेक्स तर दहिगाव सिंचन योजनेतुन 63 क्युसेक्सचा विसर्ग चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा