*कै शालिनी मधुकरराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन*
तुळजापूर:-राज्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या धर्मपत्नी शालिनीताई मधुकरराव चव्हाण वय (82) यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या राजकीय कारकिर्दीत मध्ये त्यांनी कौटुंबिक जबाबदारी शालिनी काकूंनी अतिशय चोखपणे सांभाळत चव्हाण साहेब यांच्या राजकीय जीवनात त्या साहेबांच्या पाठीमागे यशस्वी व खंबीरपणे उभ्या होत्या. साहेब राजकारणात सक्रिय असताना मुलांचे शिक्षण कौटुंबिक जबाबदारी अतिशय चोखपणे त्यांनी पार पाडली. त्या खूप मृदू स्वभावाच्या होत्या गोरगरिबांना त्यांचा कायम मदतीचा हात असायचा अशा काकू आज आपल्यातून निघून गेल्या आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!!
तसेच चव्हाण कुटुंबियांवर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे दु:ख पचवण्याची ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा