Breaking

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

तुळजाभवानी महाविद्यालयात युवा स्वास्थ्य मोहिमे अंतर्गत लसीकरण संपन्न.



तुळजाभवानी महाविद्यालयात युवा स्वास्थ्य मोहिमे अंतर्गत लसीकरण संपन्न.



तुळजापूर,दि.२९, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या युवा स्वास्थ्य मोहिमे अंतर्गत व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच उप जिल्हा रूग्णालय तुळजापूर यांच्या सहकार्याने १८ वर्षा पुढील विद्यार्थ्यांसाठी कोवीशिल्ड लसीकरण करण्यात आले, यावेळी प्रथम व द्वितीय या दोन्ही लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.यापूर्वी दि ५/१०/२०२१ रोजी देखील महाविद्यालयात लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते,प्रथम मोहिमेमध्ये ७३ लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेतले होते तर सदर लसीकरणगमध्ये एकुण २८ लाभार्थ्यांनी लस घेतली.सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रो.डॉ मेजर वाय ए डोके, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण,प्रा.ए.बी वसेकर यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा