Breaking

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

रेडा ग्रामपंचायतीत महिला राज , अन् कारभार पाहताहेत ,पतीराज ,


रेडा ग्रामपंचायतीत महिला राज , अन् कारभार पाहताहेत ,पतीराज ,


प्रतिनिधी शशिकांत सोनटक्के

रेडा ता इंदापुर येथील सरपंचपदी व ग्रामपंचायत सदस्यपदी नाव महिलेच अन कारभार पतीचा असे चित्र असल्याने रेडा ग्रामपंचायतीच्या पतीराच ,ची चर्चा जोम धरत आहे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मध्ये रेडा ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज अस्तित्वात आले एकूण 9 सदस्यांपैकी  7    माहिला आहेत असे असले तरी
कारभार मात्र सरपंच महिलेचा पती व महिला सदस्याचे पतीचे सांभाळत विकासाला गती देणार का,असा प्रश्र्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभार ग्रामसभा मासिक सभा   ई.टेंडर प्रक्रिया , विविध योजनांची अंमलबजावणी, महत्त्वाचे विकासाभिमुख निर्णय या सर्व कारभारात सरपंचांसह सर्व महिला सदस्यांऐवजी त्यांचे पतीच निर्णय घेत असल्याचे चित्र आहे. 
गावच्या विकासात महिलांना सहभागी होता यावे.महिलांना योग्य ती संधी मिळावी महिलांना राजकारणात प्रतिनिधीत्व करता,
याकडे प्रशासन लक्ष देणारा का गावच्या कारभारात हस्तक्षेप करणास्या महिलांच्या सरपंचपदावर कारवाई व्हावी.अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे,
यावं यासाठी महिलांना 50 टक्के आरक्षण दिले, सरपंचपदीही आरक्षण देऊन महिलांना कारभाराची संधी दिली जात, आहे 
रेडा ग्रामपंचायतीमध्ये अशी संधी यावेळी महिलांना प्रथमच मिळत आहे. मात्र हे फक्त नावालाच आहे 
प्रत्यक्षात राजकारणी महिलांचे नातेवाईक कारभार पाहत असल्याने महिलांचे सर्व अधिकार व हक्कां वर गदा  
येत आहे निवडणुकीत निवडून महिला येत असल्या तरीही त्यांच्या खुर्चीवर त्यांचे पती किंवा नातेवाइकच मिरवत असल्याचे चित्र आहे.
याला विरोध करण्याऐवजी स्थानिक ग्रामसेवकापासून गटविकास अधिकारी त्यांच्याशीच 
हातमिळवणी करून कारभार पुढे ढकलत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा