बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१
देशात १०० कोटी लसीकरण पुर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार*
आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाने व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या सुचने नुसार व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा भैय्या राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उस्मानाबाद यांच्या वतीने आज दि.२० ऑक्टोबर २०२१ रोजी शहरातील भोसले हायस्कुल येथे १०० कोटी लसीकरण पुर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अनोख्या पध्दतीने आभार व्यक्त केले. देशाचे कनखर नेतृत्व मोदीजी यांच्या समयसुचकता व कलपत्तेने देशातील जनतेचे आरोग्य या जागतीक कोविड महामारीचे संकटाची जी दुसरी लाट निर्माण झाली होती ती मोठया शिथापीने जास्तीत जास्त लोकांना कोविड लसीचा पुरवठा करुन ते संकट थोपवले. या बद्दल मा.पंतप्रधानांचे आभार व्यक्त करण्याच्या उद्देशाने भाजयुमो धाराशिव व विद्यार्थ्यांनी मिळुन १०० या संख्येच्या आकाराचे मोठे सांख्यकी तयार केले. या वेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा भैय्या राजेनिंबाळकर यांनी लोकांचे आरोग्य सुरक्षीत करण्यासाठी मोदीजींनी घेतलेल्या मेहनतीचे आभार मानले तसेच विद्यार्थी व युवकांना त्यांच्या लस घेण्याचे राहीलेल्या पालकांना लस घेण्याचे आवाहन केले.
Tags
# तुळजापूर

About अनिल जगताप
Chief Editor of AJ_24_Taas
तुळजापूर
लेबल:
तुळजापूर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा