*तुळजापूर शहरातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेले,पथदिवे अखेर सुरू, नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांच्या पाठपुराव्याला यश*
दिनांक ५ ऑक्टोंबर २०२१,रोजी,
तुळजापूर शहरातील बऱ्याच वर्षापासून विविध भागातील पथदिवे नसणार्या भागात यामध्ये नवीन बस स्थानक, मंगळवार पेठ, भवानी रोड, शुक्रवार पेठ, या सर्व ठिकाणी नवीन पथदिवे बसविण्यात आली,
यासाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे,यांच्या विशेष प्रयत्नातून व वारंवार केलेल्या पाठपुराव्यांतून सदरील काम पूर्ण झाले आहे.
सदरील कामासाठी प्राधिकरणाने विशेष असे सहकार्य केले आहे. तुळजापूर शहरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विकासात्मक कामे पूर्ण करण्यात आली आहेत, यामुळे भाविक व नागरिकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण दिसून येत आहे, सदरील पथदिव्यांचे लोकार्पण समारंभ नगराध्यक्ष सचिन (भैय्या )रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माझी नगरसेवक अविनाश गंगणे, यांच्यासह आदी भागातील नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा