तुळजापूर येथे तुळजाभवानी महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद
तुळजापूर,दि.५, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असा योग साधून आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदरप्रसंगी सर्वप्रथम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेच्या आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस .एम मणेर यांच्या हस्ते करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे आदरणीय शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे यांनी महाराष्ट्राला जे ज्ञान संस्कार प्रदान केले तेआपण समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी , समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजापर्यंत पुढे घेऊन जाण्यासाठी सदोदित प्रयत्नरत असावयास हवे, त्यासाठीच अशा सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रमांची गरज आहे अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ एस. एम मणेर यांनी यावेळी दिली.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांनी लसीकरणासाठी उत्तम प्रतिसाद दिला, एकुण ७३ नागरीकांचे लसीकरण यावेळी करण्यात आले.लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी तुळजापूर रुग्णालयायाचे अधिष्ठाता डॉ जाधव तसेच कर्मचारी सागावे पी.बी, शिवकन्या कांदे,शितल अभंग,अतिष रोकडे आदी कर्मच्याऱ्यांनी सहकार्य केले तर, राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा डॉ मेजर वाय ए डोके, प्रा.डॉ.एस.एम.देशमुख,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा विवेकानंद चव्हाण तसेच प्रा.अण्णासाहेब वसेकर,प्रा.धनंजय लोंढे,प्रा.आशपाक आतार ,प्रा.वागतकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि एनसीसी कॅडेट यांचे मोलाचे सहकार्य लाभले,सांघिक कार्यामुळेच सदर लसीकरण मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा