तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात लहान मुलांना प्रवेश ; नियमाचे उल्लंघन.
तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिरात वयोव्रद्ध लहान मुलांना प्रवेश देण्यावर बंदी असताना चक्क साधा पास देऊन लहान मुलांनाही प्रवेश दिला जात असल्यामुळे नियमांच उल्लंघन होत असल्याच पहायला मिळत आहे.आँनलाईन पासचा निर्णय बदलल्यामुळे पोलीस प्रशासनावर अचानक बंदोबस्ताचा ताण वाढला आहे.
लहान मुलांसह वयोव्रद्ध लोकांना साधा पास देऊन मंदीरात प्रवेश मिळत आहे .
दर्शन घेण्यासाठी आँनलाईन पास मिळवणे अपेक्षीत असताना साधा हस्तलिखीत पास देण्याचा हा मधला मार्ग काढल्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
यामुळे होणारी गर्दी वाढत आहे. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील पोलीस या परीसरात बंदोबस्तात आहेत.
अशा या गर्दिमुळे पोलीसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल डिस्टन्स व नियमांचे उल्लंघन होत आहे.
लहान मुल विनामास्क व वयोव्रद्ध लोकांच्या हातात पास असल्यामुळे प्रवेश देणार्याना अवघड झाले आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा