शहीद जवान प्रीमियर लीग टेंभुर्णी उत्कृष्ट नियोजनाने स्पर्धा संपन्न
कृष्णा साई स्पोर्ट प्रथम तर राज लाईट हाऊस द्वितीय
टेंभुर्णी प्रतिनिधी
संविधान दिनानिमित्त शहीद जवान प्रीमियर लीग टेंभुर्णी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .सदर स्पर्धा दि.०९/११/२०२१ पासून सुरू होत्या.आज दुपारी कृष्णा साई स्पोर्ट व राज लाईट हाऊस यांच्यातअंतिम सामना झाला यात राहुल टिपाले व सुजित राजमाने यांच्या कृष्णा साई स्पोर्ट प्रथम विजेता ठरला. प्रथम क्रमांक ऋषिकेश बोबडे व मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांच्यातर्फे दहा हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये व ट्रॉफी, महेश सुरवसे यांच्या तर्फे विनोद लोकरे यांचा राज लाईट हाऊस उपविजेते पद पटकावले.यावेळी बोलताना सरपंच प्रमोद कुटे म्हणाले की क्रिकेटचा वारसा फार पूर्वीपासूनच आहे. आपल्या गावात अनेक नामवंत खेळाडू क्रिकेटच्या माध्यमातून तयार झालेले आहेत.यापुढे क्रिकेट साठी ज्या काही अडचणी असतील त्या सर्वानुमते सोडवू या असे अभिवचन त्यांनी दिले. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाची गणेश खुळे यांचे 5000 रू व ट्रॉफी हे पारितोषिक विकास धोत्रे यांचा संघ विराज किंगमेकर यांने पटकावले तसेच चतुर्थ पारितोषक ॲड.अजिंक्य संगीतराव यांच्यातर्फे तीन हजार रुपये व ट्रॉफी आकाश घाडगे यांच्या अन्नपूर्णा हॉटेलने पटकावले कृष्णा साई स्पोर्टचे कर्णधार पवार व राज लाईट हाऊसचे कर्णधार विनोद लोकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की सांघिक भावनेचा खेळ असतो.जय-पराजय होतात .खिलाडूवृत्तीचे दर्शन दोन्ही टीमचा कर्णधाराकडून पहावयास मिळाले .विशेष पारितोषिकमध्ये मॅन ऑफ द सिरीज शहाजी गायकवाड, मॅन ऑफ द मॅच अण्णा सरडे यांनी पटकावले सर्वात महत्त्वाचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गणेश शिंदे यांनी केली
बक्षीस वितरणासाठी टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे, उद्योजक राजू शेठ येवले, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी जयवंत पोळ मातंग एकता आंदोलन चे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गणेश केचे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी विकास धोत्रे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ साळुंखे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंदलकर भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विजय कोकाटे, गणेश बनसोडे रामभाऊ पवार .अक्षय ढवळे नितीन पाटील .अजिंक्य संगीतराव . जमाल काझी . यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा पार पाडण्यासाठी सिद्धार्थनगर मित्र मंडळ, जय बजरंग ग्रुप, वेस्टर्न ग्रुप, रामभाऊ पवार मित्र परिवार, महामानव ग्रुप , वीरशैव कक्कया ग्रुप, इंदिरा नगर मित्र मंडळ,शिवाजी नगर मित्र मंडळ महादेव गल्ली मित्र मंडळ, यांचे सहकार्य लाभले.तसेच दादा कोल्हे,येरमाळा मच्छी, मशिनरी असोसिएशन ,लक्ष्मी गारमेंट्स यांचेही सहकार्य लाभले. स्पर्धेचे आयोजक समीर नाईकनवरे व महेश धोत्रे यांनी केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा