*सापटणे(टें) येथे विविध विकास कामांचे आ.बबनदादा शिंदे यांचे शुभहस्ते भूमिपूजन*
*शासनाच्या विविध योजना मधून केली विक्रमी 1 कोटी 33 लाख रुपयांची कामे मंजूर* *
टेंभुर्णी (प्रतिनिधी) सापटणे(टें) येथे विविध विकास कामांचे माढा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनदादा(दादा) शिंदे यांचे शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले यावेळी जि.प.सदस्य-मा.श्री.रणजितभैय्या शिंदे,मा.श्री. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी तुकाराम ऊर्फ बंडू(नाना)ढवळे,पंचायतसमितीचे सभापती-मा.श्री.विक्रमदादा शिंदे, गटनेते तथा उद्योजक विठ्ठल भाऊ ढवळे, मा.श्री.सतीश पाटील, गटविकास अधिकारी-मा.श्री.संताजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू नाना ढवळे यांनी केले या मध्ये त्यांनी आज होत असलेल्या विविध विकास कामांसाठी आमदार बबनराव शिंदे यांचेआभार मानले तसेच त्यांनी मंजूर केलेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केले. रणजित भैय्या शिंदे यांनी ही सापटणे गावातील एकजुटीने व गुण्यागोविंदाने होणार्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले. आमदार बबनदादा शिंदे आपल्या मनोगत व्यक्त करताना बंडू नाना यांनी फक्त सापटणे येथील नागरिकांचा विचार न करता सर्व कार्यकर्ते यांनी शासनाच्या संजय गांधी निराधार सारख्या योजना जास्तीत जास्त नागरिकां पर्यंत पोहोचले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख उपस्थित पोपट मामा चव्हाण , दिलीपराव भोसले,नागाभाऊ खटके, डॉ.थोरात (TMO), दादासाहेब देशमुख, तात्यासाहेब पाटील, भीमा आबा ढवळे,सरपंच-नागनाथ कुबेर, उपसरपंच -गणेश ढवळे ,तानाजी ढवळे जगन्नाथ ढवळे ,बापूसाहेब कोरडे ,पिंटू गायकवाड , नारायण गायकवाड ,पांडुरंग (तात्या )ढवळे, बाजीराव ढवळे ,नागनाथ आप्पा ढवळे, सुग्रीव ढवळे ,रवी कुबेर, प्रमोद (भाऊसाहेब )ढवळे, संजय शिंदे, अक्षय (भाऊ) ढवळे, विकी ढवळे ,पप्पू ढवळे, देविदास धोत्रे तसेच तांबवे
पिंपळनेर,पालवण,,आकुंभे,भुईंजे,अकोले(बु),परीते या गावांतुन आलेले सरपंच,उपसरपंच, पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल ढवळे यांनी केले चौकट करा रणजित भैय्या शिंदे यांनी यांनी येवढी कामे मंजूर आहेत पण या ठिकाणी बंडू नाना व विठ्ठल भाऊ आहेत त्यामुळे नक्की गुणवत्तेची कामे निश्चितच होतील परंतु तालुक्यातील कामे ही गुणवत्तेची व्हावीत त्यासाठी अधिकारी यांनी जातीने लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा