Breaking

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

सिड्स पेस्टीसाईड्स अँड फर्टिलाईझर्स डीलर्स असोसिएशनच्या.....तालुकाध्यक्ष पदी सुनिल ढवळे....



सिड्स पेस्टीसाईड्स अँड फर्टिलाईझर्स डीलर्स असोसिएशनच्या.....तालुकाध्यक्ष पदी सुनिल ढवळे...

.

श्रीगोंदा-नितीन रोही


        तालुक्याच्या सिड्स पेस्टीसाईड्स अँड फर्टिलाईझर्स डीलर्स असोसिएशन ची कार्यकारिणी निवड आणि चर्चासत्र मेळावा रत्नकमल मंगल कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी अहमदनगर जिल्हा सिड्स पेस्टीसाईड्स अँड फर्टिलाईझर्स डीलर्स असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष सतिश जी मुनोत साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष विक्रम गदादे, जिल्हाउपाध्यक्ष सौ मनिषा ताई खामकर, कर्जत तालुका उपाध्यक्ष नितीन भोईटे आणि तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते उपस्थित होते. 
 यावेळी पूर्ण तालुक्याची कार्यकारिणीची निवड करण्यात आली, त्यामध्ये निवड करत असताना श्रीगोंदा तालुका 6 जिल्हा परिषद गटातून 6 उपाध्यक्ष व श्रीगोंदा शहरातून 1 असे एकूण 7 उपाध्यक्ष निवडण्यात आले, तसेच 12 पंचायत समिती गणातून 12 सदस्यांची निवड आणि शहरातून 2 सदस्य अशी एकूण 14 सदस्य  यांची निवड सर्वानुमते करण्यात आली, व शहरामधून 1 सचिव 1 खजिनदार आणि एरंडोली मधून 1 सहसचिव व घोटवी मधून 1 सहखजिनदार अशी निवड करण्यात आली आणि माजी तालुकाध्यक्ष सुदाम गिरमकर यांची तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 
तसेच तालुक्याच्या अध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले, आणि या निवडीमध्ये श्रीगोंदा शहराध्यक्ष श्री
 सुनिल जी ढवळे यांचा 21 मतांनी विजय झाला. आणि ते तालुकाध्यक्ष झाले.
यावेळी प्रास्ताविक सादर करताना सुनिल ढवळे यांनी असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या कामाचा उहापोह केला आणि पुढील काळात असोसिएशनच्या माध्यमातून करणार असलेल्या कामांचा ही उल्लेख केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून कृषी विक्रेत्यांना येणाऱ्या सर्व अडीअडचणी वर ही प्रकाश टाकला.

निवड झाल्या बद्दल आमदार बबनदादा पाचपुते,खा-सुजय विखे,मा.आमदार राहुल जकताप,जन शक्ति संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे, राष्ट्र्वादीचे प्रदेश उपअध्यक्ष घनश्याम शेलार,नागवडे कारखाण्याचे चेरमन राजेंद्र नागवडे,जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा,मार्केट कमेटी चे सचिव दिलीप डेबरे,गट नेते मनोहर पोटे,मा-नगरसेवक दादासाहेब औटी,संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे,अंबादास औटी,मा-उप नगरध्यक्ष रमेश लाढाणे,नगरसेवक महावीर पटवा,डॉ संतोष हिरडे, सुदाम दांडेकर,दिलीप लबडे यांच्या सह मित्र परिवार, नातेवाईक,विविध पक्षातील संघटनेतील कार्यकर्त्यांनी ढवळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा