Breaking

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

छत्रपती शिवाजी विद्यालय भिमानगर स्नेह मेळावा उत्साहात संपन्न


छत्रपती शिवाजी विद्यालय भिमानगर स्नेह मेळावा उत्साहात संपन्न


      माढा तालुक्यातील छत्रपती शिवाजी विद्यालय भिमानगर इयत्ता दहावी १९९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी भिमानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक कांबळे सर उपस्थित होते.
      प्रारंभी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कांबळे सर म्हणाले की मैत्रीचं नातं निभावत असताना आपल्या आई वडिलांना विसरू नका त्यांची मनोभावे सेवा करा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी प्रमुख पाहुणे कदम सर,पवार सर, मगर सर,सागर दिवेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी परशुराम जाधव, नितीन मस्के, सुनील गायकवाड, कांचन जाधव, पूनम पारडे व उमा मोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली
        यावेळी १९९९ बॅचचे माजी विद्यार्थी परशुराम जाधव, बाळू शेंडगे,विकास मोरे, गणेश साळुंखे, बळीराम टकले,चंद्रकांत माने, महेंद्र लोकरे, हनुमंत चव्हाण,गणेश वायभासे, नागनाथ आडके, प्रदीप बाबर, आप्पा घनवट, गहिनीनाथ कुटे, संभाजी खटके, नानासाहेब यादव, जयराम मस्के, विजय रोमन, दादा गवळी, चंद्रकांत लोंढे,सोमनाथ मुळे, नितीन मस्के, बापू लोंढे, विनोद थोरात, सचिन गावडे, सत्यवान गायकवाड,अमोल जाधव ,नागनाथ गवळी,सुनील गायकवाड, सचिन मस्के, पांडुरंग कासवेद, सोमनाथ सलगर व विद्यार्थिनी सारिका पाटील, कांचन जाधव, उर्मिला मोरे, प्रणोती खंडागळे,विद्या दिवेकर, सुजाता कदम, संगीता गायकवाड,अंजना नागणे, अश्विनी ख्रिस्ती, सुषमा भालेराव, साधना पोळ,पुनम पारडे,भारती पाटील या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा