Breaking

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

महावितरण कंपनीत भोंगळा कारभार सुरू! हे पाप कुठे फेडणार? सुनील ठोसर पाटील



महावितरण कंपनीत भोंगळा कारभार सुरू! हे पाप कुठे फेडणार? सुनील ठोसर पाटील


पिपंरगव्हाण ता. जि. बीड  येथील डि.पी. जळाला व लाईट बिल भरले आहे. परंतु बीड masb ऑफिस वाले डि.पी देण्यास नाकार करतात. व शेतकऱ्यांना सांगतात की आम्हाला शासनाकडून आदेश आहे . बील वसुली करण्याचा त्यामुळे व जास्त ची बिले भरा असे सांगतात परंतु या वर्षी पाऊस काळ  जास्त असल्याने खरीपाचे सर्व पिके पाण्यात गेली आहेत. शासनाची मदत जाहीर केली परंतु शेतकऱ्यांना मिळाली नाही . शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असे सांगितले परंतू शेतकऱ्यांना मदत मिळाली च नाही व पिकविमा सुध्दा मिळाला नाही. मग शेतकऱ्यांने कुणाच्या जिवावर जगायचे आसा प्रश्न निर्माण होतो .शेतकऱ्यांना रब्बी पिकांची आशा होती परंतु masbऑफिस मधील कर्मचारी शासनाचा आदेश असल्यामुळे शेतकऱ्यांना डि.पी. देत नाहीत .  परंतु नेते मंडळी निवडणूकी च्या वेळेस शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पुर्ण करीत नाहीत पुढारी मंडळी नुसती नावाला आहेत आमदार, खाजदार,मंत्री, नगरसेवक, सरपंच ही पदे नुसती नावाला राहिली आहेत आसा प्रश्न शेतकऱ्यांला पडला आहे. यापुढे शेतकरी हातात रूमन घेऊन ऑफिस ताब्यात घेण्याची वेळ आली आहे असेही रयत शेतकरी संघटना वतीने पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा