*तुळजापूर तालुक्यातील वाघजई तांडा येथे,अपसिंगा केंद्राचे केंद्रप्रमुख ऋषी (दादा) भोसले यांनी दिली शाळेस भेट*
अपसिंगा केंद्राचे केंद्रप्रमुख ऋषी दादा भोसले, यांनी ०१ डिसेंबर २०२१, पासून सर्व शाळा सुरू झाल्याने, दि,०३, डिसेंबर २०२१,रोजी वाघजई तांडा शाळेस भेट दिली,इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्याचे शब्द वाचन,अंक वाचन तयारी पाहून केंद्रप्रमुख ऋषिदादा भोसले यांनी समाधान व्यक्त केले.तसेच केंद्रप्रमुख श्री ऋषि दादा भोसले यांनी प्राथमिक शाळा बोरी येथे शाळेस अचानक भेट दिली, व इयत्ता सहावी विज्ञान घटक Force And Different Types या घटका विषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी,श्रीमती शिंदे मॅडम विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी श्री अर्जुन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट असे नियोजन वेळापत्रकानुसार तास सुरू झालेले आहेत, सर्व शिक्षक मनापासून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात दंग आहेत तल्लीन आहेत आपसिंगा केंद्राची सर्व शाळेची तयारी करण्यात आलेली आहे, सर्व शाळांचे वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यात आली आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा