*40 ऊसतोडणी कामगारांना संतोष वारे यांचा मदतीचा हात*,
*अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर केली निवारा व जेवणाची सोय*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी कामगारांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले असून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे व जी प सदस्या सौ राणी वारे यांनी जातेगाव परिसरातील 40 ऊसतोडणी कामगारांची राहण्याची व जेवणाची सोय करून सामाजिक बांधीलकी दाखवून दिली आहे.
या अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी कामगारांचे संसार उघड्यावर आले असून वातावरण पूर्ववत होईपर्यंत या कामगारांची जेवणाची व राहण्याची सोय करणार असल्याचे संतोष वारे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा