Breaking

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

बारामती येथे बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजुरीसाठी आलेल्या मजुराचा चोरीला गेलेला खिल्लार खोंड मूळ मालकाला शोधून देण्यात वडगाव पोलिसांना यश आले*



*बारामती येथे बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजुरीसाठी आलेल्या मजुराचा चोरीला गेलेला खिल्लार खोंड मूळ मालकाला शोधून देण्यात वडगाव पोलिसांना यश आले*


        बारामती तालुक्यातील मौजे मानाजीनगर ता.बारामती जि पुणे या गावचे हद्दीत बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजुरीसाठी आलेल्या मजुराचा चोरीला गेलेला खिल्लार खोंड मूळ मालकाला शोधून देण्यात वडगाव पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यातील तीन आरोपींना वडगाव पोलिसांनी चाकण येथून रात्री उशिरा ताब्यात घेतले.
          सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे श्री.रमेश रामा करगळ (वय २५) हा युवक मूळचा बीड जिल्ह्याचा मात्र सध्या ऊसतोडणीसाठी तो कुटुंबासह मानाप्पावस्ती ता.बारामती या ठिकाणी ऊस तोडणीसाठी आला आहे. 13 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे तो ऊसतोडीसाठी गेला असता काही अज्ञातांनी त्याच्या कोपीवरील शर्यतीसाठी संभाळले खिलार बैल (खोंड) चोरून नेले. ऊस तोडीवरून संध्याकाळी कोपीवर आल्यावर आपले खोंड गायब असल्याचे रमेशच्या लक्षात आलेने आसपासच्या परिसरात शोधू घेऊन सुद्धा खोंड सापडत नसल्याने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित पणदरे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके व पोलीस नाईक हिरालाल खोमणे यांच्याशी संपर्क करून श्री.रमेश रामा करगळ यांनी खोंड चोरी झालेबाबत फिर्याद दिले वरून गुन्हा दाखल झालेला होता. 
        त्या अनुषंगाने तपासी अंमलदार पोलीस नाईक हिरालाल खोमणे यांनी गोपनीय माहिती व इतर तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयित आरोपी बाबत माहिती मिळवून काल रात्री तपास पथक आरोपींना व गेला माल ताब्यात घेणेसाठी रवाना होऊन काल रात्री उशिरा चाकण येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यानंतर चोरीस गेलेले खोंड ताब्यात घेतले. सदरची कामगिरी ही गुन्हा दाखल होवून ते आरोपी ताब्यात घेणे ही  सात तासात केलेली आहे.

       सदरची कारवाई मा.श्री.अभिनव देशमुख सो (पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण) मा.श्री.मिलिंद मोहिते (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग )  व मा.श्री.गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग) यांचे मार्गदर्शनाखाली  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन सपोनि श्री.सोमनाथ लांडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके यांच्या तपासपथक मधील पो.ना.हिरालाल खोमणे, पो.ना.दादासाहेब डोईफोडे, पो.ना. गोपाळ जाधव यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा