धर्मराज ( राजाभाऊ ) विठ्ठलराव पाटील यांचे निधन.
भिमानगर प्रतिनिधी/प्रदीपराव पाटील
धर्मराज ( राजाभाऊ ) विठ्ठलराव पाटील वय वर्षे 51 गवरमेंट कॉन्ट्रॅक्टर रा भिमानगर तालुका माढा यांचे सोमवारी सायंकाळी 6 वाजता रूदयविकाराचा तिव्र झटका आल्याने निधन झाले आहे.
धनश्री कन्स्ट्रक्शनचे चेअरमन रमेश (मालक) शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून धर्मराज पाटील यांची ओळख आहे.रांझणी,उजनी,भिमानगर व कोंडारभागात धर्मराज पाटील यांचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात होते यामुळे पाटील यांच्या जाण्याने संपूर्ण कोंडारभागावर शोककळा पसरली आहे.त्याच्यावर दु:खमय वातावरणात शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात वडील पत्नी,मुलगी,दोन मुले असा परिवार आहे.माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांचे ते बंधू व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष मेघराज पाटील यांचे धर्मराज पाटील वडील होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा