Breaking

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

राज्यात तालुक्याचे नाव होईल अशी आदर्श शिक्षण पद्धत राबविणार - सभापती विक्रमसिंह शिंदे .




राज्यात तालुक्याचे नाव होईल अशी आदर्श शिक्षण पद्धत राबविणार -  सभापती विक्रमसिंह शिंदे .

दिल्लीच्या धर्तीवर शाळांचा विकास करणार..


निमगाव टे दि प्रतिनिधी  ) 

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ,उपस्थिती वाढविणे  ,चांगले शिक्षण उपलब्ध करून देणे , तसेच ज्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीत , त्याबद्दल ठोस निर्णय घेणे ,आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देणे , या सर्व गोष्टी प्रामुख्याने करावयाच्या असून , माढा तालुका राज्यात आदर्श शिक्षण पद्धतीमध्ये नावाजला पाहिजे , असे काम करणार असून , दिल्लीच्या धर्तीवर सर्व शाळांचा विकास करणार असल्याचे , प्रतिपादन माढा तालुका पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह बबनराव शिंदे यांनी केले .
         माढा तालुका प्राथमिक शिक्षण सल्लागार समितीची मासिक प्रथम सहविचार सभा पंचायत समितीच्या सभागृहात 16 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पार पडली. यायेळी अध्यक्षस्थानाहून  शिंदे बोलत होते . यावेळी पंचायत समितीचे गट विकासअधिकारी डॉ . संताजी पाटील , उपसभापती धनाजी जवळगे , जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब उबाळे , गट शिक्षणाधिकारी फडके , पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुटे , सल्लागार समितीचे सदस्य धनंजय मोरे , राजन सावंत , गोरख वाघ , मनीषा वाबळे , भीमराव पवार,  सोमनाथ लांडे,  केंद्रप्रमुख भाऊराव शिंदे  ,वैभव कुटे , भारत वाबळे  ,रामभाऊ नवले  यांच्यासह तालुक्यातील सर्व शाळांचे केंद्रप्रमुख , शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
        या बैठकीत जिल्हा परिषद सर्व शाळेमध्ये मुलांसाठी आधार द काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याचे ठरले तसेच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये पंचवीस हजार लोकवर्गणी जमा केल्यास प्रत्येकी शाळांना 50000 निधी देण्याचे ठरले . सल्लागार समितीच्या सदस्य सह बेचाळीस लोकांना घेऊन दिल्लीच्या दौऱ्यावर जाऊन आदर्श शाळा करणार , असल्याचेही सभापती विक्रम सिंह बबनराव शिंदे यांनी सांगितले .
   प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले . यावेळी शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य राजन सावंत आणि धनंजय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले . आभार संतोष जाधव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा