Breaking

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

निवडणूक पोलादपूर नगरपंचायत**पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार.. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ*


*निवडणूक पोलादपूर नगरपंचायत*

*पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार.. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ*



पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिले असून आज रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली आज वार्ड क्रमांक 9 च्या उमेदवार तेजश्री अभिषेक गरुड आणि वार्ड क्रमांक 11 चे उमेदवार स्वप्नील सुभाष भुवड यांच्या प्रचारार्थ पोलादपूर येथे आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते
.*यावेळी रायगड जिल्हा सहप्रभारी श्रीरंग बर्गे, महाडच्या कार्यक्षम नगराध्यक्ष स्नेहल दिदी जगताप* जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर सकपाळ,जिल्हा सरचिटणीस प्रशांत महामुनकर,खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडूशेठ देशमुख,पोलादपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय सलागरे,महाड तालुका अध्यक्ष राजुशेठ कोरपे,माजी तालुका अध्यक्ष कृष्णादादा शिंदे,महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीयश जगताप,मार्तंड नाखवा,पोलादपूर शहर अध्यक्ष अमोल भुवड, युवक अध्यक्ष सचिन दुदुसकर, जिल्हा युवक सरचिटणीस मुन्ना शिंदे,जिल्हा युवक उपाध्यक्ष मयूर चांदोरकर, विधानसभा युवक अध्यक्ष ऍड सचिन गायकवाड, विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत येरूनकर, तालुका विद्यार्थी अध्यक्ष प्रसाद देशमुख सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
  *जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले की आज पोलादपूर नगरपंचायत च्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाड विधानसभा काँग्रेसचे नेते *नानासाहेब जगताप* यांच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह, युवतींचा उत्साह आणि जेष्ठ मंडळींचा सहभाग पहाता निश्चितच या नगरपंचायतीवर काँग्रेसचा तिरंगा फडकल्या शिवाय रहाणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा